दि प्रोग्रेसिव्ह उर्दु हायस्कूलमध्ये फूड फेस्टिव्हल आनंदात साजरा करण्यात आला.
शोलापुर – या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून संस्थेचे प्रभारी अध्यक्ष व सोलापूरचे प्रसिद्ध डॉ. इलियास शेख साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे संचालक रियाज बेद्रे, शफिकुरर्रहमान, काझी, आर. एम. शेख, नजीर अहमद शेख हे उपस्थित होते. यावेळी मुख्याध्यापक अ. गफूर सगरी पर्यवेक्षिका सादेका बारागाजी यांनी या फूड फेस्टिव्हलमध्ये भाग घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
या फूड फेस्टिव्हलचे इन्चार्ज महेजबीन उस्ताद, अमीना इनामदार व स्वालेहा शेख हे होते.
हा कार्यक्रम खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाला. तसेच हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशालेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी खूप परिश्रम घेतले.