सोलापुरात एमआयएमची लाट;तेलंगाणा निवडणुकीचे पडसाद

सोलापुरात एमआयएमची लाट;तेलंगाणा निवडणुकीचे पडसाद
आम आदमी पक्षाला जबरदस्त धक्का;मोठे मासे एमआयएमच्या गळाला
फारूक शाब्दीच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश सोहळा संपन्न
सोलापूर: (कलीम पटेल )-तेलंगाणा निवडणूकीत घवघवीत यश संपादन केल्या नंतर एमआयएम पक्षाची घोडदौड सुरूच आहे.सोलापुरात एमआयएम पक्षाच्या वतीने बुधवारी सायंकाळी पक्ष प्रवेश सोहळा संपन्न झाला.आम आदमी पक्षातील नेत्यांनी फारूक शाब्दी यांच्या उपस्थितीत एमआयएम पक्षात प्रवेश केला.आगामी विधानसभा व महानगरपालिका निवडणूकित एमआयएम पक्षाची बाजू भक्कम करण्याचे वचन कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी दिले.आम आदमी पक्षातील मोठे नेते आणि कार्यकर्ते एमआयएम पक्षात प्रवेश केल्याने आम आदमी पार्टीला जबरदस्त धक्का बसला आहे.आम आदमी पक्षातील इलियास शेख,नासिर तांबोळी,मोहिनोद्दीन शेख,अल्ताफ अत्तार,इसाक शेख,अब्बास शिकलगर,साजिद जमादार आदींनी एमआयएम पक्षात जाहीर प्रवेश केला.सोलापूर शहर आणि जिल्हा प्रमुख फारूक शाब्दी यांनी नव्या पदाधिकाऱ्यांचा प्रवेश करून घेत त्यांना पक्षात सन्मानाने पद देखील दिले.
*एमआयएमवची सोलापुरात लाट-
एमआयएम पक्ष सोलापुरात आल्या पासून त्याची लाट सुरूच आहे.2014 पासून एमआयएम पक्षाला सोलापुरातून नागरिकांकडून जाहीर पाठिंबा मिळत आहे.तेलंगाणा निवडणूकित घवघवीत यश संपादन केल्यापासून विरोधकांनी एमआयएमला गंभीर्याने घेतले आहे.लोकसभेत सध्या दोन खासदार दिन दुबळ्या सर्वसामान्य जनतेसाठी लढत आहेत.भविष्यात एमआयएम पक्षाच्या खासदारांची लोकसभेत संख्या वाढेल असा विश्वास फारूक शाब्दी यांनी व्यक्त केला.सोलापुरात देखील एमआयएम पक्ष जोमात विधानसभा आणि महानगरपालिका निवडणूक लढणार आणि मोठ्या संख्येने उमेदवार निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला.
*पक्ष प्रवेश सोहळ्यात मोठी गर्दी-
फारूक शाब्दी यांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रम सोहळ्यात मोठी गर्दी झाली होती.पासपोर्ट ऑफिस शेजारी असलेल्या मुख्य कार्यालयात पक्ष प्रवेश सोहळा बुधवारी रात्री पर्यंत सुरू होता.एमआयएमचे आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी कोमारु सय्यद,वाहेदा भंडाले,गाजी जहागीरदार, अशफाक बागवान, राजा बागवान,अझहर जहागीरदार, मोहसीन मैंदर्गीकर,हारीस कुरेशी,शोएब चौधरी,अनिसा डोका,सलमा सय्यद,असिफ जमादार, बशीर शेख, जुबेर बसरी, याकुब शेख, सचिन कोलते, मचिद्र लोकेकर, अशपाक शेख, मुन्ना शेख, नसीमा कुरेशी इम्रान हवालदार, आदी उपस्थित होते.


















